स्वयंघोषित गोरक्षकांवर कारवाई करा

0

मुंबई- गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणार्‍या स्वयंमघोषीत गोरक्षकांवर कारवाई करा. तसेच या गोरक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 24 तास हेल्पलाईन कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल याचिकेत करण्यात आली आहे़ वांद्रे येथील व्यावसायिक शाबाद पटेल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ऩागपूरमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला झालेल्या हलयाचे प्रकरण ताजे असताना बकरी ईदच्या पार्श्वभूमीीवर गोरक्षकांचे गट तसेच विविध संघटना बीफच्या नावाखाली कायदा स्वत:च्या हातात घेऊन े दंगलसदृश्य परिस्थिती तसेच वातावरण कलुषित केले जाऊ शकते, अशी भिती या याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.

शस्त्रे परवाने द्या
तसेच कायदेशीररित्या मांसाची विक्री करणार्‍या तसेच मांसांची ने-आण करणार्‍या व्यापार्‍यांना रक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. ती सरकार पार पाडू शकत नसेल तर या व्यापार्‍यांना संरक्षणासाठी शस्त्रे परवानग दया अशी विनंतीही याचिकेत केली आहे.

कायदा हातात घेणे यांग्ेय नाही
गोहत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी लागू झाल्यापासून देशभरात गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन 24 लोकांची हत्या झाल्या.तर जमावाकडून अनेक लोकांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. अशाप्रकारे कायदा हातात घेतला जात असल्याकडे याचिकाकर्त्यांने न्यायालयचे लक्ष वेधले आहे.प्राण्यांच्या बाजारातून गाईची कत्तलीसाठी खरेदी वा विक्री करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे़ ही बंदी निलंबित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देष दिले आहे. त्याची अंमल बजावणी करा.