स्वयंसहाय्यता महिला बचत गटांसाठीचे प्रशिक्षण वर्ग

0

तळेगाव दाभाडेः तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठीचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तळेगाव शहरातील महिलांचे जय गजानन बचत गट, सरस्वती बचत गट, मुरलीधर बचत गट, वैष्णवी महिला बचत गट, आशा बचत गट, जोगेश्‍वरी बचत गट, विरागणा महिला बचत गटातील सुमारे 65 प्रतिनिधी या प्रशिक्षणात सहभागी झालेले आहेत. या प्रशिक्षणात या महिलांना बचत गट संकल्पना बचत गटाचे रेकार्ड लिखाण तसेच इतर माहिती देण्यात येत आहे हे प्रशिक्षण महिला आर्थिक विकास महामंडळाचे वतीने देण्यात येत आहे. यासाठी प्रशिक्षक म्हणून मीनाक्षी तिकोने तसेच उज्वला ढोणे,पल्लवी गवारे या सहकार्य करीत आहेत. या महिला बचत गटाचे प्रशिक्षण मुख्याधिकारी वैभव आवारे यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक दिलीप गायकवाड यांनी आयोजन केले आहे.