शहादा । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील विविध सेवाभावी व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी दोन तास स्वच्छता अभियान राबविले. शहरातील भाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचते. परिसरात कुचका भाजीपाला पडून राहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी सुटते. या भागातील व्यापारी उरलेला व खराब झालेला भाजीपाला परिसरातच फेकून देत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होते.
पालिकेच्या निष्क्रियतेची दखल
पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे येथील कुचका भाजीपाला दोन चार दिवसाआड उचलून नेला जातो. भाजीमंडईतील अस्वच्छतेची दखल घेत संघटनांच्या पदाधिकर्यांनी स्वच्छता अभियान राबविले. संकल्प ग्रृपसह जायण्टस् ग्रृप, लायन्स ग्रृप, फायर ग्रृपच्या पदाधिकरी व सदस्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजीमंडई परिसरात अभियान राबविले. या अभियानात पालिकेच्या उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, जि.प.सदस्य अभिजीत पाटील, जायण्टस्चे माणक चौधरी, लायन्सच्या सरोज कुलकर्णी, फायरचे प्रा.आय.बी.चौधरी, प्रा. शरद पाटील, अनामिका चौधरी, राजु कुलकर्णी, शिवपाल जांगीड आदिं सहभागी होते.