नवापूर । राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात स्वयंसिध्दाग्रुपने 32 आश्रमशाळांनवर मुलींना-स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले. जानेवारी ते मार्च 2017 या कालावधीत प्रशिक्षण देऊन ते यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले. जिल्हा परिषद नंदुरबार माध्यमिक शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ चंद्रकांत पाटील यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
प्रशिक्षणाचे यशस्वी कार्य स्वयंमसिध्दाचा जिल्हा प्रमुख वर्षा राहासे, नवापूरचा ज्योती चौधरी, नंदुरबारच्या स्नेहलता शिरसाठ या स्वयंसिध्दा ग्रुपने पुर्ण केले आहे
या गावांतील विद्यार्थीनींना प्रशिक्षण
तर्हावद, बोरद, आमोनी, सलसाडी, रानीपुर, लोभानी, जांभाई, कोराई, मोरांबा, नाला, अलीविहीर, शिर्व,असली, धडगाव, भाग्रापाणी, असली, बर्डी, खडकी, बिजरी, तलाई, वडफडी, चुलवड, मांडवी, मोजरा, वडकळंबी,निजामपूर, देवमोगरा, कोलदा, धनराट, खेकडा, बंधारा, टोकरतलाव, भालेर,शहादा, नंदुरबार, या शाळांवर जाऊन प्रशिक्षणाचे कार्य पूर्ण करण्यात आले. एक यशस्वी व स्तुत्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल स्वयंमसिध्दाचे अभिनंदन व कौतुक केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे.