स्वराज यांच्या टीकेवर मीरा कुमारांंचा पलटवार

0

नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीची जणू रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मीरा कुमार ह्या राष्ट्रपतिपदासाठी योग्य नसून लोकसभाध्यक्ष असताना त्यांचे वर्तन पक्षपाती होते, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला होता. मात्र त्याचा पलटवार करताना मीरा कुमार यांनी आपल्या आरोपाला आधार म्हणून सुषमा स्वराज यांनी एक व्हिडिओदेखील ट्विट केला होता. लोकसभा अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ संपल्यानंतर मला निरोप देताना तत्कालीन सदस्यांनी माझ्या कार्यशैलीचं कौतुक केले होते. त्यावेळी कुणीही माझ्यावर पक्षपाताचा आरोप केला नव्हता, असेही त्या म्हणाल्या.

जातीला गाठोड्यात बांधून पुरायला हवे
याआधीच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांमध्ये अनेकदा उच्च जातीचे उमेदवार उभे होते. पण त्यावेळी कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही. कधी तशी चर्चा झाल्याचेही मला आठवत नाही. कोविंद आणि मी निवडणूक लढवत आहे. म्हणूनच दलित निवडणुकीला उभे आहेत, अशीही चर्चा आहे. मग आमच्यातील बाकीचे गुण गौण ठरतात. यावरून समाज आजही काय विचार करतो हे कळते. आता तर जातीला गाठोड्यात बांधून पुरायला हवे असे मला वाटते.