नवी दिल्ली : विमानाचा प्रवास म्हंटल की महागडा प्रवास असे वाटते. तिकीटदर जास्त असल्याने सर्वसामान्यांना आणि ज्यांचे आर्थिक उत्पन्न मर्यादित असते अशांना विमान प्रवास शक्य होत नाही. पण आता बस किंवा रेल्वेच्या तिकीटदरापेक्षाही कमी दरात विमान प्रवास होऊ शकतो. विमान प्रवास करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली आहे इंडिगो एअरलाईनने.
इंडिगो एअरलाईनने ‘दिवाळी सेल’ या नावाने ही ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये १० लाख आसने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. डोमेस्टिक प्रवासासाठी ८९९ रुपायांच्या तिकिटापासून सुरुवात होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कमीत कमी ३ हजार ३९९ रुपये आहेत. २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान तिकीट बुकिंग करावे लागणार. उद्याचा दिवस हा बुकिंगसाठी शेवटचा दिवस आहे. तर प्रवास ८ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत करावा लागणार आहे. इंडिगोने काही मार्ग आणि तिकीटदर दाखविले आहेत. पुणे-अहमदाबाद (१ हजार ६९९ रू.), लखनौ-दिल्ली(१ हजार २९९ रू.) दिल्ली-चंदिगड (१ हजार ६९९ रू.), पाटना-रांची (१ हजार ३९९ रू.), लखनौ-गोवा (२ हजार १९९ रू.), अमृतसह-गुवाहटी (३ हजार ०९९ रू.) हैदराबाद-देहरादून (२ हजार ९९९ रू.), दिल्ली-बागदोगरा (४ हजार १९९ रू.), असे दर इंडिगोच्या संकेतस्थळावर दाखविण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीट दर जाहीर करण्यात आले आहे. दिल्ली-क्वालालंपूर (७ हजार २९९ रू.), दिल्ली-फुकेट (७ हजार ८९९ रू.), बंगळुरू-सिंगापूर (५ हजार २९९ रू.), कोलकाता-सिंगापूर (७ हजार ५९९ रू.), बंगळुरू-बॅकाँग (६ हजार ५९९ रू.), असे तिकीट दर असणार आहेत.