स्वस्त धान्य गैरव्यवहाराचा अहवाल प्रलंबीत

0

शिरष्णे गावच्या ग्रामस्थांची अहवाल तत्काळ मिळावा अशी मागणी

बारामती : बारामती तालुक्यातील शिरष्णे गावातील स्वस्त धान्य दुकानातील गैरव्यवहाराबाबात सुनावणीचा अहवाल गेली दोन महिने प्रलंबित आहेत. हा अहवाल लवकरात लवकर मिळावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. अंजना रामचंद्र माने व सिंधुताई शिवाजी सरक यांनी पुणे जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार शंकर ग्यानबा खलाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे विभागाचे उपआयुक्त (पुरवठा) पुणे यांचेकडे अपील केलेले आहे हे अपील प्रलंबित आहे. या अपिलाचा अहवालही प्रलंबित आहे.

अद्याप कोणताही निर्णय नाही
शिरष्णे येथील स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे या प्रकरणामध्ये आकरा वेळा सुनावणी तारखा नेमण्यात आल्या मुळात 20फेब्रुवारी 2016 च्या विरूध्द रिव्हिजन अर्ज पिठासनासमोर दाखल करण्यात आलेला असून याचा अहवालही मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या प्रकरणात तपासणी अधिकारी यांनी घरोघरी जाउन शिधापत्रिकाधारकांचे जबाब घेवून व याचा अहवाल दोन महिन्यामध्ये द्यावा असे 23 नोव्हेंबर 2017 च्या पत्रात म्हटले आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यातील तेरा तेचौदा दुकानांची चौकशी
वास्तविक पाहता या प्रकरणाचा निकाल तातडीने व्हावयास हवा हे प्रकरण गंभीर असून याबाबत नागरीकांना वेठीस धरले जाते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील जवळपास तेरा ते चौदा स्वस्त धान्य दुकानांची चौकशी सुरू असून याबाबत निर्णय घेतला जात नाही असेही दिसून आले आहे.