शासनाच्या धोरणाचा निषेध ; 5 डिसेंबरच्या जळगावच्या महामेळाव्यात सहभागाचे आवाहन
यावल- 21 ऑगस्ट 2018 रोजी सरकारने घोषित केलेल्या स्वस्त धान्य दुकानातील रोख सबसीडी विरोध म्हणून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे सोमवारी यावल तालुक्यात शेतकी संघात शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ राज्य संघटना अध्यक्ष यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने 5 डिसेंबर 2018 रोजी मोर्चाचे आयोजन प्रल्हाद जी.मोदी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विश्वंभर बसू राज्य सचिव डी.एन.पाटील, राजेश अभ्यंकर व 15 तालुक्याचे अध्यक्ष तसेच तुकाराम निकम, सुनील अंभोरे, भागवत पाटील, जमनादास भाटीया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. शेतकरी संघात तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आल. त्यात विश्वंभर बसू, राजेश अंबुसकर आदींनी मार्गदर्शन केले.
जळगावच्या मोर्चात एक लाखांवर दुकानदार सहभागी होणार
शासनाने रोख सबसीडी राज्यात लागू केल्यास अराजकता माजून भूकबळीचे संख्या वाढेल त्याला विरोध म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये प्रत्येक धान्य दुकानदारासह सामाजिक संघटना, सर्वपक्षीय आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून या मोर्चात उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. जळगाव येथे होणार्या या मोर्चाच्या ठिकाणी सुमारे एक लाख स्वस्त धान्य दुकानदार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा कायदा 2013 देशात आणण्यात रेशन चळवळीचे मोठे योगदान आहे, तो कायदा सक्षम करण्यास आंदोलन चालू आहे, अशा काळात महाराष्ट्र सरकारने रेशन व्यवस्थेतील कुठल्याही घटकास विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने 21 ऑगस्ट 2018 रोजी जीआर काढून त्याची 1 सप्टेंबर 18 रोजी मुंबईमध्ये आजाद मैदान येथे दुकानात अंमल करून चालू केले आहेत. या सरकारच्या जनताविरोधी धोरणास विरोध राज्यभर घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. रोख सबसिडी देऊन भारतातील चंदिगड, पांडेचेरीतील रेशन दुकाने बंद झाल्याचे प्रसंगी सांगण्यात आले.
जळगावच्या मोर्चात सहभागाचे आवाहन
5 डिसेंबर 2018 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद जी. मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे स्वस्त धान्य दुकान यावल तालुकाध्यक्ष बाळासाहेब नवे, उपाध्यक्ष अजय कचरे, सचिव दिलीप मोरे, दिलीप नेवे, अमृत पाटील, शेख अब्दुल शेख रसूल, विलास जवरे, अरुण दांडगे, सुभाष तायडे यांच्यासह तालुक्यातील सर्व दुकानदार यांनी या मोर्चात सामील होण्यासाठी यावल तालुक्यातून जवळजवळ बारा ते साडेबारा हजार नागरीक उपस्थित राहतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी वरीष्ठ संघटना चालकांना दिले. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने दुकानदार उपस्थित होते.