लोकोपायलट तसेच गार्ड यांची आरोग्याची घेतली जातेय काळजी : तीन सेकंदात होतेय निर्जंतुकीकरण
भुसावळ : रेल्वे कर्मचार्यांच्या आरोग्याप्रती सजग असलेल्या एनआरएमयु रनिंग शाखेतर्फे सीवायएम कार्यालयानजीकच्या गुडस् लॉबीजवळ कर्तव्य बजावणार्या लोको पायलट तसेच गार्ड यांच्यासाठी निर्जंतुकीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन मंगळवार, 7 रोजी वरीष्ठ परीचालन अभियंता डॉ.स्वप्नील नीला, वरीष्ठ विद्युत अभियंता पी.के.भंज, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे मंडळ सचिव आर.आर.निकम, ईसीसी बँक संचालक आर.पी.भालेराव यांच्याहस्ते करण्यात आले.
तीन सेकंदात निर्जंतुकीकरण
रेल्वे कर्मचार्यांच्या आरोग्याप्रती सजग राहत विशेष ‘इन हाऊस’ अशा या बोगद्यात केवळ तीन सेकंदांच्या वेळेत पूर्णपणे निर्जंतुकीकरण येथे केले जात जाते शिवाय सोल्यूशनची फवारणी करण्यासाठी पीव्हीसी पाइपिंग आणि स्प्रे नोजल लावण्यात आले आहेत. निर्जंतुकीकरण कक्षात प्रवेश केल्यानंतर कर्मचार्यांना समोर हात वर करण्याचा सल्लाही दिला जात आहे.
यांचे विशेष परीश्रम
या उपक्रमासाठी शाखा सचिव ए.टी.खंबायत, प्रदीप गायकवाड, शाम तळेकर, संजय श्रीनाथ, किरण नेमाडे, एच.के.चौरसिया, एस.एस.वानखेडे, अनिल मालविया, अस्लम, डी.बी.महाजन, हरीमोहन, जंगले, जैस्वाल, योगेश विनंते, के.पी.हिरे, योगेश व्यवहारे, मोहन इंगळे, डी.जी.मोरे, जे.एस.सोनवणे, दिनेश भागवत, एम.पी.चौधरी, बी.पी.पाटील, कमलेश शुक्ला, आकाश कुमार, संदीप सुरवाडे, ए.व्ही.अडकमोल, एस.डब्ल्यू.अहिर, सचिन महाजन, अकबर अली, डॉ.आजीम, सरबजीत सिंह, आर.एम.चौधरी, सैय्यद सादीक,पी.पी.जंगले, चेतन चौधरी आदींचे विशेष सहकार्य लाभले.