स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करुन दुकान रद्द न झाल्यास २९ मे ला भाजपा पदाधिकाऱ्यांचे उपोषण

0

नवापूर: तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारावर कार्यवाही करुन दुकान रद्द करण्याची मागणी नवापूर भाजपाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, नवापूर तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारांवर कारवाई करण्याबाबत तसेच दुकाने रद्द करण्याबाबत संदर्भीय पत्रात नमुद केले आहे.यावर पत्र मिळाल्यापासुन सात दिवसाच्या आत कळविण्यात आले होते.परंतु आपल्या विभागाकडुन आजतागायत कार्यवाही झालेली नाही. आपल्या विभागाकडुन लेखी खुलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे २९ मे २०२० रोजी नवापूर तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणावर सनदशीर मार्गाने उपोषण करणार आहोत.
निवेदनावर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित यांची स्वाक्षरी आहे. निवेदन देतेवेळी राजेंद्र गावित, एजाज शेख,जयंतीलाल अग्रवाल आदी उपस्थित होते.
भाजपा नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली पाच लोक उपोषणाला बसणार असुन जोपर्यत कारवाई होत नाही तोपर्यत उपोषण सुरु राहील, अशी माहिती जयंतीलाल अग्रवाल यांनी दिली.