भुसावळ। शहरातील पंचशील नगरातील कष्टकरी, कामगार, मोलकरीन महिलांना पिवळे कार्ड असताना देखील स्वस्त धान्य मिळत नसल्यामुळे या महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बुधवार 2 रोजी सकाळी 11 वाजता आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात प्रांताधिकारी चिंचकर यांना निवेदन दिले आहे.
या आहेत मागण्या
पिवळे कार्ड व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार कमी धान्य देतात, अशा दुकानदारांवर कारवाई करावी. केशरी कार्ड धारकांना अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करुन त्यांना त्वरीत धान्य पुरवठा सुरु करण्यात यावा. पिवळे कार्ड असूनही काही लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही अशा दुकानांमध्ये चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यांनी घेतला सहभाग
उपोषणात आसीफ बागवान, रऊफ पटेल, शेख मुजाहिद, शेख गुलाब शेख नबी, रिजवान शेख कलीम, सैय्यद रहेमान सै. बाबु, रजना शिरतुरे, जमिला गवळी, शबानाबी शेख सलीम, निर्मला पवार, मंगला जवरे, सायरा हमीद, जकीया लियाकत यांनी सहभाग घेतला.