भुसावळ। स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरणात होणारे घोळ लक्षात घेता शासनाने ई- पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य वितरण प्रणालीचा अवलंब केला असून लाभार्थ्यांच्या अंगठ्यावर धान्याचा साठा मिळणार आहे. शहरातील 15 बंगला भागातील प्रल्हादनगरातील स्वस्तधान्य दुकान क्र. 54 मधून ई-पॉस मशिनद्वारे लाभार्थ्यांना धान्य वितरणास सुरुवात झाली.
प्रल्हाद नगरात यंत्रणा कार्यान्वित
तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना तहसिल कार्यालयामार्फत ई- पॉस मशिनचे वाटप करण्यात आले असून या मशिनद्वारेच धान्य वाटपाच्या सुचना तहसिलदारांनी केल्या होत्या. त्यानुसार प्रल्हाद नगरातील स्वस्त धान्य दुकानात एन.पी. नरवाडे माजी नगरसेविका नंदा निकम यांच्याहस्ते धान्य वितरण करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदारांच्या आदेशानुसार जिल्हाभरात ई-पॉस मशिद्वारे धान्यवितरण सुरू झाले आहे. त्यामुळे वितरण प्रणालीतील दोष दूर होण्यास मदत होईल. गुरूवारी प्रल्हादनगरात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अय्यु महेबूब खाटिक, सुभान तडवी, शेख नईम अब्दूल सत्तार, दशरथ पगारे, बेबी लाखे, शेख रसूल शेख बशीर, सुनील गुंजाळ, छाया साळुंके यांच्यासह अन्य लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य मिळाले.