स्वस्थ मन आणि शरीरासाठी योग – दिनचर्या महत्त्वाची :- भारतीय योग सास्थेचे प्रमुख देशराज जी यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ( प्रतिनिधी ) व्यक्ती हा केवळ शारीरिकच नव्हे तर तो मानसिक दृष्टया आणि सामाजिक दृष्टीनेही स्वस्थ असला पाहिजे. योग हा त्यासाठी उत्तम मार्ग आहे. असे प्रतिपादन भारतीय योग संस्थान चे अखिल भरारीय प्रमुख देशराज जी यांनी केले. आपली दिनचर्या कशी असावी यावर त्यानी मार्गदर्शन केले.
भारतीय योग संस्थान नवी मुंबई क्षेत्राच्या वतीने दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अर्धदिवाशीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भरारीय योग संस्थानचे अखिल भारतीय प्रमुख देशराज जी हे प्रथमच नवी मुंबईत आले होते. त्यांच्या सोबत व्यासपीठावर महाराष्ट्र प्रमुख अशोक बेसेर हे देखील उपस्थित होते.
देसराज जी म्हणाले की व्यक्ती केवळ शारीरिक दृष्टीने स्वस्थ असून चालत नाही. मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या देखिल स्वस्थ असला पाहिजे. यासाठी आपली दिनचर्चा आणि नियमित योग आवश्यक आहे. या सर्व कार्यक्रमात श्री देशराज यांनी दिनचर्च्ये आणि आहार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विविध योग आसनाचे प्रत्यक्षिल सह महत्त्व विषद केलं.
या कार्यक्रमात वेळापूर , नेरुळ आणि उलावे येथील शेकडो योग अभ्यासक उपस्थित होते.
या कार्यक्रमात विभाग मंत्री मुंबई राजकुमारी सिंह , जिल्हा प्रधान श्री जनार्धंन सिंह, जिल्हा मंत्री,श्री देवब्रता चटर्जी, छेत्र प्रधान श्री प्रफुल साळुंखे श्रीमती प्रतिभा भुजबल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक योग साधकांनी सहकार्य केलं.