20 सप्टेंबरपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव- भाजपातर्फे जिल्हाभरात सुमारे 500 ठिकाणी विविध गावांमध्ये स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहणासह महागौरव पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार रक्षा, खासदार ए. टी. पाटील, अॅड. किशोर काळकर, उपाध्यक्ष पी.सी. पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, कृउबा सभापती लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खासदार रक्षा खडसे व खासदार ए.टी. पाटील यांनी केलेल्या कामांची माहिती दिली.
ही कामे पूर्ण
जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदार संघात विविध महामार्गांचे विस्तारीकरण, डांबरीकरण यासह आदर्श ग्राम योजनेअंतर्ग केंद्र स्तरावरून कोणताही निधी उपलब्ध नसताना केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विविध निधी अंतर्गत विकास कामे पूर्ण करण्यात आली. यात लोकसहभागाद्वारे स्वच्छतागृहे, गाव तंटामुक्त अभियानाअंतर्गत गावातील वाद, गावातच मिटविण्यासाठी विशेष प्रयत्न, रस्ते काँक्रीटीकरण, दिवाबत्ती, एलईडी, दिव्यांची व्यवस्था, सामाजिक सभागृह, आदी कामे पूर्ण करण्यात आली.
भूसंपादन प्रक्रिया
सार्वजनिक स्वच्छता अभियानाअंतर्गत व्यक्तिगत शौचालये जे थे शक्य नसतील तेथे तीन ते पाच घरे मिळून सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करण्यात आली. खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, आदर्श ग्राम योजनेअंतर्ग चोपडा तालुक्यातील हातेड गावात मुलभूत सुविधांसाठी 7 कोटींची कामे जवळपास पूर्णत्वास आलेली आहेत. यात सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते कॉेंक्रीटीकरण, तंटामुक्ती, उज्वला गॅस, घरकूल, जुने जिर्ण झालेल्या शिधा पत्रिका नूतनीकरण, प्राथमिक शाळांचे नूतनीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावरील रावेर, सावदा, निंभोरा आदी स्थानकांवरील रेल्वे ओव्हरब्रीजची निविदा प्रक्रिया, भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत.
खा. पाटील यांची माहिती
खासदार ए. टी. पाटील यांच्य जळगाव लोकसभा मतदारसंघात आदर्श ग्राम योजनेअंतर्गत भोरस गावात विविध विकासकामू पूर्ण करण्यात आली असून राज्यमार्ग क्रमांक 15 एरंडोल- येवला रस्त्याचे नूतनणीकरण निविदा प्रक्रियेसह मालेगाव, जळगाव औरंगाबाद महामार्गांसाठी निधीची उपलब्धता केंद्र शासनाच्या 2515 अंतर्गत मान्यता देण्यात आली असून तिसराव चौथा लोहमार्गाचे मंजूरीचे काम 2000 पासू प्रलंबित होते, ते गेल्या दोन वर्षापूर्वी भूसंपादन प्रक्रियेसह जळगाव- भुसावळ दरम्यान तिसर्या लोहमार्गाची चाचणी देखील घेण्यात आली.
असे असतील कार्यक्रम
30 ठिकाणी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाद्वारे दुचाकी रॅली, 30 ऑगस्टपर्यंत 3 हजार 300 ठिकाणी बुथनिहाय मतदानकेंद्रांवर केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण कार्यक्रम यात एक केंद्रप्रमुख व 25 कार्यकर्त्यांचे पथक असेल. यात नव मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे वाचन यासह एक ते 20 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 85 ठिकाणी जिप गटनिहाय व शहरातील नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षित केलेल्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येतील. 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर दरम्यान प्रत्येक तालुकाबुथ प्रमुखांचा प्रशिक्षण मेळावा, होणार असल्याचे उदय वाघ यांनी सांगितले.