पिंपरी : उन्हाचा चटका वाढल्याने स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असले, तरी आता स्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. पण, त्याची तीव्रता काही अंशी कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दररोज 20 ते 25 स्वाइन फ्लूचे आढळणारी रुग्णसंख्या आता पाच ते सहावर आली आहे. बुधवारी (दि.14) शहरात स्वाइन फ्लूचे सहा रुग्ण आढळून आले. दरम्यान, प्रादुर्भाव कमी होत असेल तरीही नागरिकांनी घरातून बाहेर पडताना नाका-तोंडाला रुमाल किंवा मास्क लावूनच बाहेर पडावे. सर्दी, घसा, खोकला आणि ताप ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.