स्वाइन फ्लूच्या लस खरेदीसाठी स्वतंत्र निधी

0

पुणे । स्वाइन फ्लूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्यातील सोळा जिल्ह्याच्या जिल्हा हॉस्पीटलला 300 ते 500 लस खरेदीसाठी स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय आरोग्य खात्यातर्फे नुकताच घेण्यात आला आहे.

यावर्षी स्वाइन फ्लूची मोठ्या प्रमाणात नागरीकांना लागण झाली. राज्यभरात 500 हून अधिक नागरीकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. आणि पाचपेक्षा अधिक बळी गेले आहेत. अशा जिल्ह्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस खरेदीसाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. तसेच या अंर्तगत काही जिल्ह्यांना निधी प्राप्त झाला आहे व लस खरेदी देखिल सुरू करण्यात आली आहे. राज्यात स्वाइन फ्लूचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. 500 लसींच्या खरेदीसाठी 1 लाख 78 हजार, तर काहींना केवळ 78 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

निधी उपलब्ध
महाराष्ट्रात सर्वाधिक स्वाइन फ्लूची लागण पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, नागर या जिल्ह्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच हॉस्पिटलला त्यांच्या स्तरावर लस खरेदी करावी लागणार आहे.
-डॉ. मुकुंद डिग्गीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग