पुणे : उपचारासाठी पुण्यात दाखल झालेल्या एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 69 वर पोहचली आहे. 2015 मध्ये 821 रुग्ण एचवनएनवन बाधीत आढळले होते. तर 89 रुग्णाचा मृत्यू झाला होता. 1 जानेवारी 2016 ते 17 जुलै 2016 दरम्यान 26 रुग्ण स्वाइन फ्लू बाधीत आढळले होते. त्यापैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
10 जण व्हेंटिलेटरवर
शहरात जानेवारी महिन्यापासून 344 रुग्ण स्वाइन फ्लू बाधीत आढळले आहेत. तर 1 हजार 437 संशयित रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या 10 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्याला अंदाजे चार स्वाइन फ्लू बाधीत रुग्ण दगावण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. नागरीकांनी पावसाळ्यात स्वतःची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पुणे पालिकेने केले आहे.
साथीच्या आजारात वाढ
शहरात साथीच्या आजारांमध्ये देखिल वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, उलड्या, जुलाब सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचे खाणे टाळून पाणी उकळून पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
एका दिवसात 3 हजार 184 जणांची तपासणी
सातारा जिल्हातील 40 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला डेंग्यू देखिल झाला होता. बुधवारी (19 जुलै) रोजी 3 हजार 184 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 110 संशयीतांना टॅमी फ्लू देण्यात आले आहे. तर 14 रुग्णांचे घशातील स्त्रावाचे नमुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. स्वाइन फ्लू बाधित चार रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.