स्वाईन फ्लूचे 6 बळी

0

वसई – वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी 6 रुग्ण दगावले आहेत. तर 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी स्वाईन फ्लूची गंभीर दखल घेवून तत्काळ आयसोलेशन वार्ड बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत.