पुणे । स्वाईन फ्लूमुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. मृतांची संख्या आता 74 वर पोहोचली आहे. तर अजूनही 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वडगाव बुद्रूक सिंहगड रोड येथील 52 वर्षीय इसमाला 15 जुलै रोजी स्वाईन फ्लूची लागण झाली होती. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. तर भोर तालुक्यातील एका 46 वर्षीय महिलेवर 21 जुलैपासून उपचार सुरू होते. रविवार सकाळी 7.35 तिचा मृत्यू झाला. तर तिसरा इसम हा औरंगाबाद जिल्ह्यातील होता. त्याच्यावर 29 जुनपासून उपचार सुरू होते. 22 जुलै रोजी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा महिन्यात संशयित 4 लाख 66, 581 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 930 रुग्णांना टॅमी फ्लूची मात्रा देण्यात आली. त्यापैकी 355 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.