स्वाईन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू 

0
पुणे : शहरात स्वाईन फ्लूमुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दोन मृत्यूंमुळे आता शहरात स्वाईन फ्लूमुळे दगावलेल्यांची संख्या 28 वर पोहचली आहे.
मंगळवारी (4 एप्रिल) सातार्‍याहून पुणे शहरात उपचारासाठी आलेल्या  55 वर्षीय रूग्णाचा खासगरूग्णालयात मृत्यू झाला. या रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास कृत्रिम श्वासोच्छासावर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान  मंगळवारी (4 एप्रिल) त्याचा मृत्यू झाला. तसेच सोमवारी (3 एप्रिल) कोरेगाव पार्क येथे राहणार्‍या 61 वर्षीय रूग्णाचा खाजगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे.