स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड । स्वाईन फ्लूने कासारवाडी येथे राहणार्‍या एका 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 381 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यातील 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 319 रुग्णांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. कासारवाडी येथील 36 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून 16 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने त्या महिलेला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना महिलेचा शनिवार (दि. 23) मृत्यू झाला.