स्वाईन फ्लूने वन कर्मचार्‍याचा मृत्यू

0

चाळीसगाव येथील घटना; नगरपालिकेचा स्वच्छतेचा होतोय बोजवारा

चाळीसगाव । चाळीसगाव वनविभाग परीक्षेत्र जुवार्डी येथील वनरक्षकाचा स्वाईन फ्लू आजाराने औरंगाबाद येथे एमटीएम खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना २४ सप्टेंबर रोज सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला असून परीसरात मात्र खळबळ उडाली आहे. कर्मचार्‍याचा मेडीकल रिपोर्ट वनविभागाने नगरपालिकेला दिला असून याबाबत पाहिजे त्या उपाययोजना झाल्या नसल्याने दिसून येत आहे. मयत चव्हाण यांच्या मुलाला अनुकंपनावर नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे वनअधिकार्‍यांनी सांगितले.

चाळीसगाव नगरपालिकेत स्वच्छतेबाबत विरोधक आक्रमक
मयतांच्या मुलाला अनुकंपातून नोकरी लवकर मिळविण्यासाठी प्रयत्न करणार- संजय मोरे
नितीन कुमार अमरसिंग चव्हाण (४३, रा. सुयश लॉन्स समोर कैवल्य नगर) हे सैन्यदलात नोकरी करून चार वर्षापुर्वी त्यांची नियुक्त वनविभागात झाली होती. ३ वर्षे चोपडा येथे वनविभागात सेवा बजावल्यानंतर एक वर्षापासून ते चाळीसगाव येथे वनविभाग जुवार्डी वनरक्षक म्हणून कार्यरत होते. ३ आठवड्यापुर्वी त्यांना थोडा त्रास जाणवल्याने घश्याचा त्रास होत असल्याने त्यांनी प्रथमोपचार चाळीसगाव येथे खासगी रूग्णालयात केला. मात्र त्याचा फारसा काही फरक पडला नाही . साधाण २ आठवड्या पुर्वी ते त्यांच्या जुवार्डी बिटात सेवा बजावत असतांना मोटारसायकल वरून त्यांना त्यांच्या नातेवाईक व सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांना घरी आणून खासगी रूग्णालयात प्रथोमचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथील एमटीएम रूग्णालय या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत. डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे सांगितले. त्यांना यावर उपचाराला प्रतिसाद दिला मात्र पुन्हा अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटीलेटर ठेवण्यात आले होत. उपचार सुरू असतांना २४ रोजी त्याचा सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी सांगितले की, कर्मचारी नितीन चव्हाण यांचा दुदैवी मृत्यू झाला असून दोन आठवड्यापुर्वी त्यांना त्रास झाल्याने त्यांना औरंगाबाद येथे खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्यानंतर रूग्णालयाकडून सर्व रिपोर्ट घेवून वनविभागाचे मानद वन्यजिव रक्षक राजेश ठोबरे यांना देवून त्यांनी तो रिपोर्ट नगरपालिका मुख्याधिकारी यांना देवून उपाययोजन करण्यास सांगितले यावर त्यांनी मयत कर्मचार्‍याच्या घराच्या आजू बाजूला फवारणी केली मात्र पुढील यपाय योजना म्हणून त्या कर्मचार्‍याच्या कुटूंबातील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घ्यायला हवे होते. मयत चव्हाण यांच्या मुलाला अनुकंपातून नोकरी लवकर मिळावी त्यासाठी प्रयत्न करणार असून तातडीची मदत म्हणून ४ लाख रूपयांची तातडीची मदत वनविभागाकडून देणार असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी मोरे यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

न.पा.वर स्वच्छेतेबाबत ताशेरे
चाळीसगाव शहरात स्वच्छतेबाबत गेल्या महिनाभरापासून अनेक तक्रारी येत आहे. याबाबत वृत्तपत्रामध्ये बातम्या देखील प्रकाशित झाल्या. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना स्वच्छतेाबाबत पत्र देखील दिले होते. याचाच प्रत्यय म्हणून सफाई कर्मचारी, आरोग्य निरीक्षक यांनी आरोग्य सभापती यांनी मारहाण केल्याचे व सफाई कर्मचार्‍यांवर (काही वगळता) कारवाई करणार असल्याचे खुद्द आरोग्य सभापती, नगराध्यक्ष, गटनेते यांनी पत्रकार परीषद घेवून सांगितले होते. यावरून चाळीसगाव शहरात स्वच्छेतचा बोजवार उडाल्याचे दिसून येत आहे. याचा फटका सामान्य नागरीकांना बसत असून साथीचे आजार व अनेक आजारानी त्रस्त नागरीक रूग्णालयात भरती झाले असल्याचे दिसून येत असून शहरातीलच वनविभाग कर्मचार्‍याचा स्वाईन फ्लूची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून स्वच्छता मोहिम तीव्र करावी संशयीत रूग्णाच्या रक्ताचे नमुने घ्यावेत अशी मागणी आता होऊ लागली आहे.