पिंपरी : स्वाईन फ्लूमुळे शहरातील कहर वाढत चालले आहे. स्वाईन फ्लू आजाराने मृत्यूंचा व बाधितांचा आकडा दिवसें-दिवस वाढत आहे. या जीवघेण्या आजाराने शुक्रवारी रहाटणीमधील एका 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ‘स्वाईन फ्लू’ने शहरात कहर केला असून जानेवारीपासून अद्यापपर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. शुक्रवारी तीन बाधित रुग्ण आढळले असून तीन रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलेले आहे. या आजाराने अद्यापपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 219 वर पोहचली असून वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोग्य विभागावर टीकेची झोड होत आहे. मात्र, हा भयग्रस्त आजार रोखण्यात महापालिकेला अपयश येताना दिसत आहे.