एरंडोल । शहरातील 46 वर्षीय युवकाचा स्वाईन फ्लू सदृश्य आजाराची लागण झाल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शहरातील आणखी तीन ते चार रुग्ण स्वाईन फ्ल्यू बाधित असुन त्यांचेवर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते. याबाबत माहिती अशी कि, शहरातील भगवा चौक परिसरातील रहिवाशी विशाल ड्रेसेसचे संचालक प्रवीण बबन शिंपी (वय-46) यांना ताप आल्यामुळे त्यांचेवर शहरातील दोन खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
मात्र त्यांना कोणताही फरक न पडल्यामुळे त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना न्युमोनिया होऊन पांढर्या पेशी कमी झाल्या होत्या. त्यांना स्वाईन फ्लू सदृश्य आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना आकुर्डी येथे पेना अर्थो या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु झाला. मयत प्रविण शिंपी यांचे पच्छात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.दरम्यान शहरात स्वाईन फ्लू सदृश्य आजारामुळे तरुणाचा मृत्यु घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधला असता आमच्याकडे स्वाईन फ्लू चा एकही रुग्ण दाखल नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संकेत पाटील यांनी सांगितले.