स्वाक्षरी मोहीम

0

खालापुर : 1 ऑगस्ट रोजी खालापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कूलुगुरु यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे जे काही विद्यार्थ्यांचे निकाल रखडले गेलेत तर त्यांच्या या कृतीचा जाहिर निषेध करण्यासाठी के.एम.सी कॅालेज खोपोली येथे विद्यार्थ्यांनी सह्यांची आंदोलन राबवुन त्यांचे निवेदन कुरिअरने विद्यापीठात पाठवून अनोखे आंदोलन करीत कुलगुरू हटाव मोहिम राबवण्यात आली. यावेळी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष अंकीत साखरे, के.टी.एस.पी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, खालापुर पंचायत समितीचे सभापति श्रद्धा अंकित साखरे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने के.एम.सी कॅालेजच्या गेटवर उपस्थित होते.