कल्याण : गुढीपाडव्या निमित्त डोंबिवलीत काढली जाणारी स्वागत यात्रा याची ख्याती पार सातासमुद्रापार गेली आहे. दरवर्षी प्रमाणेच मोठया दिमाखात ही स्वागत यात्रा निघणार आहे. एक दिवस अगोदर पासुनच स्वागत यात्रा मार्गावर सर्व सोयींची केल्या आहेत. महानगरपालिका, पोलीस, वाहतूक पोलीस सर्वच या यात्रेसाठी सज्ज झाले आहेत. भविष्याचा वेध घेणारी डोंबिवली या विषयावर आधारीत सर्व चित्ररथ साकारले जाणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सकाळी सहा वाजता गणेश मंदिराची पालखी प्रथम निघाल्यावर त्यामागोमाग बाकी सर्व चित्ररथ मार्गक्रमण करणार आहेत. या स्वागत यात्रेत एकूण ६० संस्थांचा सहभाग असणार आहे. डोंबिवलीतील चार रस्ता फडके रोड, मानपाडा रोड, स्टेशन परिसर, पुर्व पश्चिमेला जोडणारा पुल या प्रमुख चौकांमध्ये स्थानिक नगरसेवक स्वागत यात्रेत सहभाग घेणा-या संस्थांवर पुष्पवृष्टी करण्यात येते. यासाठी या चौकात मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीसांसाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. ढोल ताशा पथकांचाही उशिरापर्यंत सराव सुरु होता.एकंदरच महिना भर अगोदरपासुन सुरु असलेल्या जोरदार तयारीच चीज मंगळवारी होणार आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पुर्वसंध्येला अनेक ठिकाणी आतिषबाजीही करण्यात आली. दरवर्षीच सर्व संस्था या यात्रेतुन समाजप्रबोधनात्मक संदेश देण्याचे मोलाचे काम करतात. कल्याणातही अशाच प्रकारची तयारी सुरु होती