स्वागत कमानीचे उद्घाटन

0

पुरंदर : पुस्तकातून जगाचे ज्ञान मिळते ते अन्य कोठुनही मिळत नाही. यामुळे पुस्तक हेच आपले सर्वस्वी गुरू आहेत, असे मत प्रशासकीय अधिकारी के. देशमुख यांनी व्यक्त केले.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्री भुलेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थी प्रकाश यादव यांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अशोक मोरे तर प्रमुख म्हणून हभप लक्ष्मण महाराज यादव, संस्थेचे सचिव विश्वास चव्हाण, सरपंच ललिता यादव, श्री भुलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास शिंदे, सावळाराम नवले, प्रकाश यादव, सुनील यादव, अनिल गद्रे, बाळासाहेब यादव, गणेश ढोले, दिलीप गायकवाड, माऊली यादव, रमेश गायकवाड, महादेव बोरावके परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामदास शिंदे यांनी केले तर सुनील जाधव यांनी आभार मानले.