पुणे । भवानी पेठ गुरुनानकनगर येथून पुना कॉलेजकडे रस्ता जातो. त्या मध्यवर्ती ठिकाणी पुणे छावणी-स्वच्छ छावणी व शेजारी ‘छावणी आपका स्वागत है।’अशी कमान उभारण्यात आली असून एका बाजूला रहदारीचा रोड बंद असून त्या रोडचे काम अर्धवट आहे. त्या ठिकाणी कचर्याचा कंटेनर भरून वाहत असून दुर्गंधी पसरली आहे. अशाप्रकारे कँन्टोन्मेट आपले काम करीत आहे का? असाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.