स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्याहस्ते व्हावे ध्वजारोहन

0

जळगाव । येत्या स्वातंत्र्यदिनी जळगावी एखाद्या प्रामाणिक नागरीकाच्या हस्त ध्वजारोहन करणेबाबतचे विनंतीपत्र जिल्हा जागृत जनमंचचे प्रतिनिधी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते शिवराम पाटील, डॉ. सरोज पाटील, अनिल नाटेकर व गुरुनाथ सैंदाणे यांनी पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. तसेच अधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

कामकाजावर नाराजी…
विनंतीपत्रात, आपण अडीच वर्षापासून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून घटनात्मक राज्यस्तरीय खाते प्रमुख आहात. त्या पदावरून निहीत,विधीवत जबाबदारी पार पाडलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात रस्ते खराब आहेत.अपघात होत आहेत. माणसे मरत आहेत. कोर्ट आदेश करीत आहे. तरीही आपण आपल्या अधीन सा.बां.खात्याला कार्यक्षम करू शकले नाहीत.अधिकार्‍यांचा लठ्ठ पगार,भरपूर निधी असतांना फक्त मंत्र्यांची ईच्छाशक्तीअभावी रस्ते दुरूस्त केले नाहीत.परिणामी सरकारमधील महत्वाचे खाते सा.बांधकाम, निष्क्रिय झालेले आहे. या निष्क्रियतेची सर्वस्वी जबाबदारी मंत्री म्हणून आपली आहे. म्हणून आम्ही लोकशाही राज्यातील नागरीक आपल्या कामकाजावर,पदावर,आधिकारावर नाराज आहोत.

जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भारताच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन करीत असाल तर लोकशाहीला,सरकारला बाधा येत आहे. सद्यस्थितीत जळगांव जिल्ह्यातील रस्ते,तापी नदीवरील सावखेडा स्थित पुलाची दुरावस्था आपणास कळवूनही आपण दुर्लक्ष केलेले आहे.ननागरिकांची प्रत्यक्ष भेट ,लेखी अर्जविनंती करूनही आपण दुर्लक्ष केलेले आहे.हे पदाला अशोभनिय आहे.पदाची प्रतिमा डागाळणारे आहे.कर्तव्यच्युती आहे. जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ध्वजारोहन करणे पदसिद्ध हक्क असला तरी कर्तव्यपुर्ती न केल्याने हक्क बाधीत होत आहे. तरी येत्या स्वातंत्र्यदिनी जळगावी प्रामाणिक नागरिकाचे शुभहस्ते ध्वजारोहन करावे अशी अपेक्षा जिल्हा जागृत जनमंचने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.