स्वातंत्र्यदिनी भुसावळातून भाजपातर्फे निघणार दुचाकी रॅली

0

भुसावळ- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील (डी.एस.ग्राऊंड) खासदार रक्षा खडसे यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी 9.15 वाजता ध्वजारोहण होणार असून त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भुसावल नगरपालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांसह युवा मोर्चा, महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले यांनी केले आहे.

पालिकेत नगराध्यक्ष करणार ध्वजारोहण
पालिकेचे ध्वजारोहण नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सकाळी 10 वाजता होणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष लक्ष्मी रमेश मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी केले आहे.