स्वातंत्र्यदिनी मोफत रिक्षा सेवा

0

पुणे । आम आदमी रिक्षा चालक संघटना ही सामाजिक बांधिलकीचा वसा जपत काम करत असतानाच रिक्षा व्यवसायाची सामाजिक प्रतिष्ठा सुधारण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. येत्या स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना पुणे स्टेशनपासून 10 किमीपर्यंत मोफत रिक्षा प्रवासाचा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी दिली. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हा उपक्रम राबवला जाईल. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींनी घ्यावा त्यासाठी या नंबर वर इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे सहसचिव आनंद अंकुश यांनी केले आहे.