‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विज्ञानवाद’ या विषरावर झाले व्याख्यान

0

शिक्षणतज्ञ प्रा.डॉ.जयंत कुळकर्णी यांचे मार्गदर्शन; पुरुषोत्तम व्याख्यानमालेचे आयोजन

पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ प्रणीत शहादा महाविद्यालयात झाले व्राख्रान

शहादा । शहाद्यात बुधवारची संध्याकाळ किमान दिड ते दोन हजार रसिक श्रोत्यांसाठी मोठीच यादगार ठरली. कालच्या दिवशी पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ प्रणीत शहादा महाविद्यालयाच्या सरदार पटेल सभागृहात पुरुषोत्तम व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. ’स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विज्ञानवाद’ या खणखणीत विषयावर व्राख्रान झाले. शिक्षणतज्ञ प्रा.डॉ.जयंत कुळकर्णी यांनी व्राख्रानात विनायक दामोदर सावरकर नावांचं आयुष्यभर पेटतं असलेलं धगधगतं अग्नीकुंड व्याख्याते असे वर्णन केले. अंदमानातले सावरकर अंदमानाअगोदरचे सावरकर आणि नंतरचे सावरकर अशा तीन टप्प्यात सावरकरांचा जीवनयज्ञ त्यांनी प्रतिपादित केला. विज्ञान समजणे हा एक भाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोण येणे हा दुसरा भाग असल्याचे त्यांनी सावरकर समजावून सांगतांना सांगितले.

कंगोरे यांचे मागर्दर्शन
हैद्राबाद येथील प्रसिद्ध विचारवंत, सावरकरांच्या अजब, अचाट व विशाल व्यक्तिमत्वाचे कंगोरे त्यांनी मोठ्या तन्मयतेने मांडलेत. कोणताही धर्म सांगतो ते सत्य नाही तर सत्यमेव जयते म्हणजेच सत्य हाच धर्म आहे. उपयुक्ततेच्या कसौटीवर तपासूनच प्रत्येक गोष्ट आणि विचार स्विकारला पाहीजे. असे अत्यंत उपयुक्त आणि मौलिक विचार स्वातंत्र्य काळात सावरकर नुसते सांगून नाही गेलेत तर जगून गेलेत असे कंगोरे रांनी सांगितले.

सीमा प्रश्‍नावर 1930 मध्ये केले भाष्य
आजच्या डोकलाम आणि तिबेटच्या प्रश्‍नावर सावरकरांनी 1930 मधेच भाष्य केले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशहितासाठी त्यागाची, परिसीमा गाठणारे, कुटूंब आणि परिवाराची पुरती वाताहत झालेले, प्रचंड धैर्यशाली सावरकर कीती दूरदृष्टीचे होते याची अनेक उदाहरणे व्राख्रानातून देण्रात आली. सावरकरांच्या छापले न गेलेल्या पुस्तकावरची बंदी हे जगातील एकमेव उदाहरण असल्याचे ते म्हणालेत. सावरकरांचा स्वभाव रोखठोक असल्याने विदेशी कपड्यांच्या होळी वरून टिळकांशी त्यांचे उघडपणे मतभेद झाल्राचे सांगण्रात आले.

यांची होती उपस्थिती
सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, दूरदृष्टीची राष्ट्रनीती, उपयुक्त असलेली धार्मिकता आणि वैज्ञानिकता समजावून घेण्यासाठी आपल्याला 50 वर्षाचा कालावधी जावा लागतो असा कबुलीजबाब त्यांना शिक्षा ठोठावणार्‍या न्यायाधिशांनाच द्यावा लागतो यापेक्षा एव्हढ्या प्रचंड प्रगत आणि दूरगामी विचारांचे दुसरे उदाहरण असू शकते काय.?असे व्राख्रात्रांनी सांगितले. संस्थेच्या सचिव कमल पाटील, अध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, प्रा.मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.