जळगाव । स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने वीर सावरकर रिक्षा युनियनच्या वतीने रिक्षा रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले होते. ला.ना.सार्वजनिक विद्यालया जवळील संपर्क कार्यालयापासून रिक्षा रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रमुख मान्यवर म्हणून वीर सावरकरांचे प्रतिमेचे पुजन अॅड. सुशिल अत्रे यांनी केले.
यावेळी वीर सावरकर युनियचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, आर.टी.ओ वैद्य, अॅड. विजय काबरा, डॉ.ए.जी.भंगाळे, पीएसआय प्रदिप देशमुख, आरटीओ रावते मुकूंद सपकाळे, डॉ. मुळीक यांनी वीर सावरकरांच्या यशोगाथा याविषयावर मनोगत व्यक्त केले. अॅड. विजय काबरा व आर.टी.ओ वैद्य यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ला.ना. विद्यालयापासून शाळेजवळील कार्यालयापासून कोर्ट मार्ग रेल्वे स्टेशन, पत्र्या हनुमान, टॉवर चौक, जुने स्टॅड, शिवाजी पुतळा मार्ग, नवीन बस बसस्थानक वीर सावकरांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते वीर सावरकरांच्या पुतळ्यास माल्यार्पन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भानुदास गायकवाड, अनिल निळे, पोपट ढोबळे, संजु ठाकूर, विलास ठाकुर, सचिन पाटील, अशोक रोकडे, ललित कानडे, शशिकांत जाधव, संजय भावसार, मोरे सर, पाटील सर, संजय सोनवणे, सुभाष शोचे, राजु माढरे, किरण मराठी, एकनाथ बारी, संभाजी पाटील, उत्तम पाटील, पिंटू मराठे, बाळू कोळी यांनी परिश्रम घेतले.