मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस (CDS) परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्याची सुविधा आणि नि: शुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस (CDS) परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म ९ आगस्ट ते ८ सप्टेंबर २०१७ या कालावधीत भरावयाचे आहेत. ज्या तरुणांना सैन्यदलात आपले भवितव्य घडवून देशसेवा करायची आहे, त्यांच्यासाठी हे आवेदनपत्र भरून देण्याची निःशुल्क सोय स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केली आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेसाठी आँनलाईन नि: शुल्क मार्गदर्शन Savarkar IAS Study circle या युट्युब वाहिनी वर उपलब्ध आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी 9221849650 या क्रमांकावर संपर्क साधून प्रत्यक्ष यावे, असे आवाहन स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे.