स्वातंत्र्यसैनिक जेठालाल शाह यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणार

0

चाकण : नऊ ऑगस्ट हा दिवस भारतात क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी देशभरातील निवडक स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. या वर्षी महाराष्ट्रातील पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात जेठालाल शाह यांची ही निवड करण्यात आली आहे.

शाह मूळचे अहमदनगरचे असून स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ते नगरमध्ये राष्ट्र सेवा दलाचे आघाडीचे कार्यकर्ते होते. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धनांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने त्यांनी या चळवळीत झोकून दिले. सेवादलाची आणि स्वातंत्र्यलढ्याच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गोवा मुक्तिसंग्रामाच्या आंदोलनाच्या सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्यातून उपसंचालक म्हणून ते निवृत्त झाले. अलीकडेच माझी पितृभूमी -महाराष्ट्र- अहमदनगर हे त्यांचे पुस्तक प्रकशित झाले आहे.