जळगाव । डॉ. देशातील बागायती शेतकरी आत्महत्या करीत आहेत याला निसर्ग नाही तर सरकारची धोरणे जबाबदार असून इच्छया मरण मागितले तर त्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. आत्महत्या वाढल्यात तरी निगरगठ्ठ शासन जागे होत नाही. त्याला जाग आण्यासाठी शेतकर्यांचा संप आहे. त्याच्यानेही जर हे सरकार उठले नाही, तर येत्या 15 आगस्ट स्वातंत्र दिनी मंत्रालय समोर शेतकरी आत्मदहन करीत असा ईशारा किसान क्रांती शेतकरी कृती समितीने दिला आहे.
जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असून त्यांचे लक्ष्य वेधने यासाठी व् आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ति,विजबिल माफ़ी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी त्यानुसार उत्पादन खर्चावर आधारित भाव,शेतकर्यांना निवृत्तिवेतन, दुधाला 50 रुपये प्रतिलीटर भाव मिळावा, तुषार व् ठिम्बक संचावर 100%अनुदान मिळावे, रासायनिक खतांवर पूर्वी प्रमाणे सबसिडी मिळावी व किटकनाशकांच्या नफेखोरी वर नियंत्रण ठेवावे यासाठी 1 जून पासून शेतकरी संपावर जाणार असल्याचे निवेदन किसान क्रांती शेतकरी कृती समितीने च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यांचा होता सहभाग
यावेळी किसान क्रांति शेतकरी कृती समिती चे राज्य समन्वयक एस बी पाटील, संजीव बाविस्कर, राधेश्याम चौधरी, जगतराव पाटील, दगड़ू शेळके,संजय चौधरी,विवेक रणदिवे,अजित पाटील, प्रवीण देशमुख,जयंतदादा देशमुख,मधुकर पाटील, बापू मराठे,अड़ विश्वासराव भोसले,राजेंद्र पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, मेहमूद बागवान,गोकुळ पाटील, ज्ञानेश्वरपाटील,भास्कर पाटील, शांताराम पाटील, भैय्या राक्षे, सुधीर पाटील, व्ही डी नाना पाटील, डी वाय पाटील, अशोक पाटील, धर्मा पाटील, श्याम पाटील हजर होते.