स्वातंत्र्यानंतरही जामनेर तालुक्यातील झोपडी तांडा बस सेवेपासून वंचीत

0

शेंदुर्णी : शहरात नुकताच पत्रकार दिन साजरा करण्यात आली. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन शेंदुर्णी शहर पत्रकार संघातर्फे महात्मा गांधीजीच्या ‘खेड्याकडे चला’ हे वाक्य कृतीत उतारत शेंदुर्णीपासून जवळच असलेल्या परंतु शासनाच्या ‘गांव तेथे बस’ या ब्रिद वाक्याचा स्पर्शही न झालेल्या झोपडी तांडा या गावात आद्यापर्यंत शासनाच्या सुविधांपासून वंचीत राहिला आहे. झोपडी तांडा हे लिहे तांडा गृप ग्रामपंचायतीत येत असला तरी स्थानिक नागरीक हे अशिक्षित असल्यामुळे या गावाला शासनाच्या अनेक विकास योजना पासुन कोसो दुर असलेल्या येथील सर्व दैनिकांचे पत्रकारांनी गावास भेट देऊन प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, मुख्यमंत्री आदर्श गांव योजने सारख्या विविध विकास योजनेतुन फायदे मिळवुन देण्यासाठी शेंदुर्णी शहर पत्रकार संघाकडुन प्रायोगिक तत्वावर हे गांव दत्तक घेण्यात आले असुन आगामी एक वर्षात येथील नागरीकांच्या समस्या या आपल्या समस्या समजुन त्या प्राधान्य क्रमानुसार सोडविण्यात येतील.

गावातील 70 टक्के नागरीक उसतोड कामगार
गावातील 65 झोपड्या वजा घरे व 450 लोकवस्तीचे लिहा गृप ग्रामपंचायतशी जोडलेल्या या तांड्यातील 1 महीला ग्रामपंचायत सदस्य म्हणुन निवडून आलेल्या असुन या गावाचा मुख्यव्यवसाय शेती आहे. मात्र शेतीसाठी पाणी नसल्याने येथील 70 टक्के नागरीक उसतोड कामगार म्हणुन काम करतात. गावासाठी खडबडीत रस्ता असतांना सुद्धा स्वातंत्र्याच्या 69 वर्षातही हे गांव बससेवेपासुन वंचीत असल्याचे झोपडीतांडा या गावीतील नागरीकांनी समस्या माडतांना शासनाचे डोळ्यात अंजन घालणारे तसेच शाळेत जायला बस नसल्याने अनेक मुलींना व मुलांना 4 वीपर्यत शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. मात्र आता पत्रकारामार्फत जामनेर बस आगार प्रमुखाकडे पुन्हा बस सेवेची मागणी मांडा व स्वातंत्र्याचे 70 व्या वर्षात तरी आम्हाला व आमच्या मुलाबाळांना शिक्षणाचे व विकासापासून दुर ठेऊ नका व मुख्य प्रवाहात आणा, अशी आर्त हाक देण्यात आली आहे.

एकही तरूण शिक्षित नाही
माध्यमिक शिक्षणापासून वंचीत या गावांत एकही उच्च शिक्षीत मुलगा किंवा मुलगी आढळुन आले नाही तसेच उच्च मिळत शिक्षणच नसल्याने कोणीही शासकिय नोकरीत नसल्याचे व शासकिय योजनानाविषयी अनभिज्ञ असल्याचे आढळुन आले. बससेवेची मागणी ग्रामपंचायत ठरावाद्वारे व शालेय समितीकडून अनेक वेळा जामनेर बस आगार प्रमुखाकडे केल्याचे ग्रामसेवक काळे व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संजय राठोड व नागरीकांनी सांगीतले. त्याची त्वरीत दखल शासन व जामनेर बस आगार प्रमुखांनी घेउन बस सुरु करावी, अशी मागणी शेंदुर्णी शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्यांनी केली आहे.