जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकातून एकाची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी कार्यरत असून पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
स्वातंत्र्य चौकातून दुचाकी चोरीला
विलास मधुकर चौधरी (55, डोंगरकठोरा, ता.यावल) हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ते दुचाकी (एम.एच.19 सी.एच.5789) ने जळगावात आले होते. शहरातील स्वातंत्र्य चौकातील बाल न्यायालयाच्या समोर गेटजवळ त्यांनी दुचाकी पार्क केली मात्र काही वेळेनंतर चोरट्यांनी ती लांबवली. शनिवार, 9 एप्रिल रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक बापुराव बडगुजर करीत आहे.