स्वातंत्र्य चौकात दोन दुचाकी धडकल्या

0

जळगाव। शहरातील स्वातंत्र्य चौकात शुक्रवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्या. दरम्यान, रस्त्यातच दोघा तरूणांमध्ये वाद झाल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. त्यानंतर नागरिकांच्या मध्यस्थीने वाद मिटला.

स्वातंत्र्य चौकात दुपारी भास्कर मार्केटकडून दोन दुचाकी स्वातंत्र्य चौकाकडे येत होत्या. दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातून एकाने वळण घेतला असता दुसर्‍या दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले जावून किरकोळ दुखापत झाली. मात्र, भर रस्त्यावरच दोघांमध्ये वाद झाल्याने बघ्यांची वाहनधारकांची गर्दी जमली होती. अखेर नागरिकांनी मध्यस्ती घेतल्यानंतर दोघांची समजूत घातल्यानंतर वाद मिटला. या अपघातात दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली तर दुचाकींचे देखील किरकोळ नुकसान झाले होते.

वेगवेगळ्या अपघातात दोन जखमी
जळगाव- जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकींच्या रस्ता अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, दोन्हीही जखमी हे यावल तालुक्यातील आहेत. पहिल्या दुचाकीच्या अपघातामध्ये यावल तालुक्यातील शिरसाड येभील राकेश प्रकाश चौधरी (वय-32) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाता-पायाला दुखापत झाली आहे. तर दुसर्‍या घटनेतर यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील सोमा आनंदा कोळी (वय-35) हे देखील दुचाकीवरून घसरून पडले आहेत. यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघातातील दोन्ही जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर त्यांच्या प्रकृति स्थिर असल्याचेही वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे.