स्वातंत्र्य चौकात प्रवासी, चालकात फ्रिस्टाईल

0

जळगाव। रिक्षा ठरविल्यानंतर इच्छितस्थळी उतरताना चालक आणि प्रवासी युवक यांच्यात शाब्दीक बाचाबाचीतून प्रकरण हातघाईवर जाऊन हाणामारीपर्यंत भांडणाने सिमा गाठल्याचा मामला गुरूवारी सकाळी महात्मा गांधी उद्यानाजवळ झाला. यामुळे स्वातंत्र्य चौक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. मात्र, झालेल्या हाणामारीत तिघेही जखमी झाले आहेत. दुपारी पोलिस ठाण्यात वाद आल्यानंतर आपआपसात वाद मिळविण्यात आला.

पोलिस ठाण्यातही गर्दी…
कैलास चिंतामण बाविस्कर (रा.जैनाबाद) हा रिक्षाचालक भुषण पुंडलिक सोनवणे (रा.शेळगाव) याच्यासह रेल्वेस्थानकाकडून निघाला होता. स्वातंत्र्य चौकात नरेश विश्वकर्मा (रा.विसनजीनगर) यांने रिक्षा थांबवली. विश्वकर्मा याला रिक्षातून महाबळ परिसरात जायचे होते. दरम्यान, भाड्याचे पैसे व रिक्षात बसवण्यावरून चालक कैलास याने वाद घालण्यास सुरूवात केली. सेकंदातच हा वाद विकोपाला जाऊन कैलास व भुषण या दोघांनी विश्वकर्मा याला मारहाण करण्यास सुरूवात केली. रिक्षात ठेवलेल्या लोखंडी पट्टीने विश्वकर्माच्या हातावर वार केले. याचवळी पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे हे त्या परिसरातून जात असताना त्यांना ही मारहाणीची घटना दिसली. त्यांनी तीघांनाही तंबी देत जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दुपारी 12 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात गर्दी झाली होती. नंतर हा वाद आपसात मिटवण्यात आला. दरम्यान, ही मारहाण सुरू असताना स्वातंत्र्य चौकात गर्दी झाली होती. झालेल्या फ्रि स्टाईलमध्ये नरेश विश्वकर्मा या युवकाच्या हातास दुखापत झाली. नंतर त्यास जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,एम.एच.19. 1777 तसेच एक विना क्रमांकाची दुचाकी पोलीसांनी जमा केली असून विना क्रमांकाची दुचाकीची चौकशी पोलीस करणार आहेत. तसेच या घटनेमुळे दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.