स्वातंत्र्य चौकात बसच्या धडकेत दुचाकीचे 12 हजाराचे नुकसान

0

जळगाव- आकाशवाणीकडून कोर्टचौकाकडे जात असलेल्या दुचाकीला बसस्थानकात येत असलेल्या बसने मागून धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने दुचाकीवरील छायाचित्रकार कुणाल रविंद्र चौधरी वय 32 रा. आदर्शनगर हे सुदैवाने बचावले असून दुचाकीचे 12 हजाराचे नुकसान झाले आहे.

आदर्शनगर येथे अगस्ती अपार्टमेंट येथे कुणाल रविंद्र चौधरी हे कुटुंबासह राहतात. त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. 7 रोजी 10.30 वाजता ते त्याच्या दुचाकीवरुन (क्र. एम.एच 19 ए.सी. 3110) वरुन आकाशवाणी चौकाकडून स्वातंत्र्य चौकमार्गे कोर्टचौकाकडे जात होते. स्वातंत्र्य चौकात सिग्नलवर ते थांबले. याठिकाणी दुचाकीचे मागे धुळे-जळगाव ही बस (क्र. एम.एच 14 बी.टी.1790) उभी होती. सिग्नल हिरवा झाल्यानंतर चौधरी हे दुचाकी घेवून निघत असतांना मागून येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी बसच्या समोरील चाकाखाली तर दुचाकीवरुन चौधरी हे बाजूला पडल्याने वाचले. अपघातात दुचाकीचे दोन्हीचे साईड पॅनल, पुढील बाजूचे डाव्या साईडचे पॅनल, पुढील बाजूचे आतील फायबर पॅनल, इंजीन डॅमेज झालेले असून पुढील चाकाचे मडगाळे, साईड मिरर, हेडलाईट, असेब्ली व स्टॅन्ड असे 12 हजार रुपयांचे नुकसान झालेले नाही. याबाबत कुणाल चौधरी यांनी बसचालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघातानंतर बस व अपघातग्रस्त दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.