स्वातंत्र्य सेनानी शाहीर हरिभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी

0

साक्री। तालुक्यातील कासारे येथील बहुउद्देशीय वि्द्यालयात स्वातंत्र्य सेनानी शाहिर हरिभाऊ पाटील(नंदुरबार)यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबीरात 504 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 46 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यासाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले आहे. तसेच शाहिर हरिभाऊंना जिवन गौरव पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुधाकर बोरसे,माजी शिक्षण उपमंत्री डॉ.शालिनी बोरसे,माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, डॉ.जी.एन.मराठे,डॉ.दिलीप पाटील(धुळे),डॉ.योगेश देसाई (नंदुरबार),डॉ.जयवंतराव अहिरराव(साक्री),अ‍ॅड. एस.जे.भामरे, दिनकरराव पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप काकुस्ते, पोपटराव सोनवणे व संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
विद्यालयात सकाळी सात ते नऊ योग प्राणायाम शिबिर झाले. सकाळी 10 ते 2 मोफत नेत्र तपासणी शिबीर झाले.त्यात कांता लक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबारचे पथकाने 504 रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी 46 रुग्णांना मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यासाठी नंदुरबार येथे पाठविण्यात आले. रुग्णांना चष्मा,येणे-जाणे,जेवण मोफत दिले जाईल. दुपारी 2 ते 3 मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. दुपारी 3 ते 7 शाहिर हरिभाऊ पाटील जिवन गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

शाहीर हरिभाऊंचा परिचय
शाहिर हरिभाऊ पाटील यांनी स्वांतत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर विरदेलच्या दलित वस्तीत व नंदुरबार येथील कंजर मेहतर वस्तीत संस्कार केंद्र -पाळणा घर,कसाई मोहल्ल्यातील गणेश उत्सवाची सुरुवात केली. ते नंदुरबार शहीद स्मृतींचे अध्यक्ष,लोकमान्य टिळक वाचनालयाचे संचालक,राष्ट्र सेवादलाचे सल्लागार,मराठी शाहिर परिषदेचे संचालक अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. संयोजन विश्वस्थ डॉ.पी.डी.देवरे,संजय देसले,शाशीभूषण देसले,मुख्याध्यापक किरण सोनवणे,एम.ए.भामरे,ए.एन.देसले,बी.एस.नेरकर,एच.के.देसले,सौ.के.पी.देसले,सौ.शैला देवरे,सौ.रुपाली भदाणे,तुषार सोनवणे यांनी केले.

विशेष पुरस्काराने गौरविले
धनदाई तरुण ऐक्य मंडळ, मालपुर ग्रामपंचायत,गोल्ड मेडलिस्ट डॉ.दिलीप पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व शासनाकडून पुरस्कारप्राप्त डॉ.सचिन नांद्रे(दहिवेल महाविद्यालय),नुकतीच पी.एच.डी.मिळविलेले पिंपळनेर महाविद्यालयाचे डॉ.नितीन सोनवणे, चंद्रकांत मोतीराम देसले(ग.स.बँक,धुळे), उत्पल नांद्रे,डॉ.योगेश देसाई(नंदुरबार), श्रमिक हायस्कुल छडवेल(प.), साक्री समाचारचे संपादक एस.एन.खैरनार, प्रा.एल.जी.सोनवणे, रशिया देशातून खेळाचे दोन मेडल जिंकणारा तेजस पोतदार यांना विशेष गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.