नाशिक:– येथील साहित्यिका स्वाती किशोर पाचपांडे यांच्या अनघा प्रकाशन प्रकाशित ‘सुनंदिनी’ ह्या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन शुक्रवार २२ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत सभागृहात संपन्न होणाऱ्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ठाणे येथील अनघा प्रकाशनचे संस्थापक मुरलीधर नाले हे भूषविणार आहेत. जेष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.प्रकाशक अमोल नाले,सौ.सुनंदा चुडामण पाटील ह्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर पाचपांडे यांनी केले आहे.