महाराष्ट्रावर होणार्या अन्यायाची जाणीव मराठी माणसाला होत नाही हीच सर्वात मोठी शोकांतिका
पिंपरी-चिंचवडचे प्रभारी किशोर शिंदे : दैनिक जनशक्तिला दिली सदिच्छा भेट
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्रावर व मराठी माणसावर सध्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे; पण त्या अन्यायाची जाणीव मराठी माणसाला होत नाही, ही सर्वात मोठी शोकांतीका आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष व राज ठाकरे हे मराठी माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आज मराठी माणसाला स्वाभीमानाने जगायचे असेल, तर मनसेशिवाय प्रर्याय नाही, असे मत पिंपरी-चिंचवड मनसेचे प्रभारी व पुणे महापालिका गटनेते किशोर शिंदे यांनी व्यक्त केले. ‘दैनिक जनशिक्ती’च्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय विभागाशी संवाद साधताना ते बोलत होते.
या वेळी ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके, कार्यकारी संचालक किरण चौधरी, सरव्यवस्थापक, हनुमंत बनकर, जाहिरात व्यवस्थापक अमित शिंदे, विशेष प्रतिनिधी बापू जगदाळे, जनशक्ती डिजिटलचे उपसंपादक प्रदीप चव्हाण, मनसेच्या महाराष्ट्र चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, चित्रपट सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन धोत्रे, संघटक आनंद कुंदूर, सहसंघटक दत्ता घुले, शिवनाथ दिलपाक आदी उपस्थित होते.
भाजपाच्या सत्तेला मनसेच सुरूंग लावणार
शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे, तर राज्यात मोदींचे महत्व वाढण्यास देखील मनसेच कारणीभुत होती. तेव्हा आम्ही देखील गुजरात पॅटर्न पाहण्यास त्यांच्या राज्यात जात होतो; पण नंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी फक्त आपल्या गुजरात राज्याचाच विचार अधिक केला. तेव्हा, ठाकरे यांनी त्यांच्या धोरणाचा प्रखर विरोध केला व आताही करत आहेत. आज राज्यात अनेक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले असून यांच्या कोणत्याच धोरणात मराठी माणसाला स्थान नाही. हे मराठी माणसाने प्रथम लक्षात घ्यावे. याचाच विचार करुन आगामी काळात संपूर्ण राज्यात मनसे रान उठवल्याशिवाय राहणार नाही. याची सुरवात मराठवाडयाच्या दौर्यापासून झाली आहे. त्याठिकाणी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम मनसेच करणार आहे.
हे देखील वाचा
राष्ट्रवादी व कॉग्रेस ‘ब’ टीमच सत्तेवर
राज्यात भाजप व शिवसेना सत्तेवर असली किंवा पिंपरी-चिंचवड, पुणे यासह इतर महापालिकेत भाजप सत्तेत असली, तरी यामध्ये सत्तर टक्के पदाधिकारी हे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता ही दोन्ही पक्षाच्या ‘ब’ टीमचीच सत्ता आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणताही बदल झालेला नाही, उलट समस्यांमध्ये अनेक पटीने वाढच झाली आहे.
औद्योगिक क्षेत्र परप्रांतीयाच्या ताब्यात
आज पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्ट्यात अनेक मोठ्या पदांवर राज्याबाहेरील महाराष्ट्रव्देशी लोक बसले आहेत. त्यामुळे स्थानिक लोक ांना नोकर्या मिळत नाहीत. आयटी क्षेत्र, तर केव्हाच मराठी तरुणासांठी बंद झाले आहे. कारण या क्षेत्रातही दाक्षिणात्य राज्यातील व रिष्ठांचाच भरणा आहे. उद्योग धंदा, बांधकाम क्षेत्र या सर्व ठिकाणावर अमराठी व्यक्तींचा वरचष्मा आहे. या सर्वांचा गुलाम म्हणून सध्या मराठी माणसाला वागणूक मिऴत आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांत इतर राज्याप्रमाणेच स्थानिकांना 80 टक्के रोजगार हा कायदा इथेही केला केला पाहिजे.
शहरातील पदाधिकार्यांना ताकद मिळणार
शहरातील मनसेची फळी मजबुत करुन सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘मनसे’ची देखील हेल्पलाईन अद्ययावत होणार आहे. ‘मनसे’च्या आंदोलनाची धार आता आणखी तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसात राज ठाकरे स्वत: शहरात जातीने लक्ष घालून संघटनात्मक बांधणी व कार्यकर्त्याकडे लक्ष देणार आहेत. यामुळे पुढील 2022 च्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘मनसे’ शहरात निर्णायक भूमिका बजावेल.
मराठा कलाकारांना व्यासपीठ : परदेशी
मल्टिफ्लेक्स चित्रपटगृहातील खाद्य पदार्थांबाबत प्रेक्षकांची केली जाणारी लुट थांबवण्यासाठी देशात फक्त एकमेव मनसे पक्षाकडूनच आंदोलन केले होते. न्यायालयाला देखील पक्षाची बाजू पटली होती. त्यामुळेच त्यांनी या बाबत योग्य निर्णय घेतला होता. पण भाजप पक्षाने तो निर्णय न्याय प्रक्रियेच्या माध्यमातूनच फिरवून प्रेक्षकांच्या आर्थिक लुटीस मान्यता दिली, असे मत मनसे चित्रपट सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी व्यक्त केले. आज या क्षेत्रामध्ये प्रतिभावंत मराठी कलाकार पुढे यावे यासाठी चित्रपट शाखा पुढाकार घेत असून अनेक कलाकारांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले आहे व यापुढे मिळवुन देणार असल्याचेही त्यांंनी सांगितले.