धुळे । शेतकर्यांच्या मागण्या मान्य करण्यात यावेत अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहेत. अनेक वाहनांचे नुकसान होऊन वित्तहानी होत आहे. ज्या बळीराजामुळे संपूर्ण देशाला अन्न मिळते त्यामुळे आम्ही जगत आहोत, त्याच बळीराजाला आत्महत्त्या कराव्या लागत आहेत.
शेतकर्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन
शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णत: न्याय देण्यास अपयशी ठरत आहे. एकीकडे संपूर्ण देशात डिजीटल इंडियाचा नारा दिला जाते. केवळ जाहीरातींवर करोडो कोटी रुपये फक्त जाहिरातीसाठी खर्च केला जातो आहे. परंतु जो शेतकरी कृषीप्रधान भारताचा कणा आहे, त्या बळीराजाचे कंबरडेच मोडले जात आहे. किती मोठा विरोधाभास आहे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी शेतकर्यांच्या बाजूने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकर्यांची मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे. अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा, विभाग प्रमुख डॉ.एन.जी.हासवाणी यांनी कौतुक केले आहे.