बुलडाणा । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एनडीएला सोडचिठ्ठी दिली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील ऊस, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले. येत्या 10 पासून राज्यव्यापी दौरा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बांधणी करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 4 तारखेला स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडत असून आम्ही आमचा पाठींबा काढून घेत असल्याचे सांगितले. यावेळी तुपकरांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देखील मुख्यमंत्र्यांकडे दिला.