भुसावळ- भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या 10 मे रोजी 64 वा वाढदिवस असल्याने जिल्ह्यात स्वाभिमान सप्ताह राबवला जात आहे. 5 रोजी शहरात कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा व रक्तगट तपासणी शिबिर झाले तर रविवारी कामगारांना व गरजूंना चप्पल वाटप करण्यात आली सोमवार, 7 रोजी आरोग्य सकाळी 10 वाजता डॉ.एजाज अहमद खान अॅक्सल हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर होत असून 8 रोजी सकाळी नऊ वाजता वरणगाव रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच 9 रोजी सकाळी 10 वाजता भुसावळातील संत गाडगेबाबा नगर पालिका दवाखान्यात फळ, बिस्कीट, ग्लुकॉनडी वाटप होईल. त्यानंतर आनंद बुध्द विहार, रेल्वे दवाखान्याशेजारी भुसावळ येथे रक्तदान शिबिर, नवीन शाखांचे उद्घाटन व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरळकर, भुसावळ तालुकाध्यक्ष अॅड.मनोहर सपकाळे, वि.स.क्षेत्र प्रमुख सचिन वानखेडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश इंगळे, प्रबोधनकार प्रतिष्ठान, हॅप्पी क्लबने केले आहे.