स्वाभीमानी भारत अभियानतर्फे संपर्क अभियान

0

चाळीसगांव : सर्व आंबेडकरी समाज बांधव एकसंघ झाला पाहीजे, त्यांचेत एकजुट झाली पाहीजे यासाठी स्वाभीमानी भारत अभियानतर्फे 5 व 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे मुख्य संयोजक धर्मभुषण बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क अभियान राबविण्यात आले.

स्वाभीमान भारत अभियानतर्फे सालाबादाप्रमाणे दि. 5 व 6 डिसेंबर रोजी सर्व आंबेडकरी समाज एकजूट व्हावा यासाठी व आप-आपसातील गट-तट बंद व्हावा असा विचार लोकांमध्ये पसरविण्याकरीता दादर चैत्यभूमी येथे संपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी 2 दिवसात राज्यातील व राज्याबाहेरील सुमारे 2 हजार लोकांनी अभियानाचे सभासद होण्यासाठी नाव नोंदणी केली. 5 रोजी रात्री 12:30 वाजता चैत्यभूमी दादर येथे एकाच गणवेशात रॅली काढण्यात आली व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी स्तुपाजवळ समाज एकजूटीसाठी निर्धारपुर्वक शपथ घेण्यात आली यावेळी अभियानाचे मुख्य संयोजक धर्मभुषण बागूल व एनएनएफचे अध्यक्ष सुनिल भालेराव यांनी या रॅलीस मार्गदर्शन करून उपस्थित समाज बांधवांना शपथ दिली.