स्वामी प्रतिष्ठानला दांडिया रासिकाची पसंती

0

निगडी : स्वामी प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी प्रतिष्ठानला 5 वर्ष पूर्ण झालीत. स्वामी प्रतिष्ठान दर वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी 9 दिवसांमधे दांडिया रसिकांना त्याचा उत्साह वाढविण्यासाठी विविध बक्षीस देण्यात येतात. वेशभुषा, दांडिया ग्रुप, डान्स अशा विविध प्रकारच्या स्पर्धा भरविल्या जातात. दांडिया रसिकांना बक्षीस देण्यात येते. प्रतिष्ठानला विविध क्षेत्रातील दिग्गजांची आवर्जून उपस्थिती असते. प्राधिकरण परिसरातील सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी स्वामी प्रतिष्ठानला पहावयास मिळते. 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच सफल रिलीफ ट्रस्टच्यावतीने पूर्ण पिंपरी-चिंचवड मधून तिसर्‍या क्रमाकांचे बक्षीस पटकविले आहे. कमी वेळेतच हा मान मिळाला आहे. स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित धुमाळ व कार्यध्यक्ष तेजस डेरे यांनी सांगितले की, हे बक्षीस आम्हाला मिळून देण्यास दांडिया रसिक व नागरिक यांनी जो विश्‍वास आमच्यवर ठेवला त्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले आहे. हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी अभिजीत कौर, अमोल भोंडवे, अजिंक्य नलावडे, अभिजीत काचोळे, आनंद यरगोळे, अक्षय बागल, दीपक डेरे, सागर कस्पटे, पंकज शेट्टी, मयूर झेंडे, आशिष चव्हाण, अनुज डेरे, तनिष्क डेरे, अमर जवळकर, सुजीत नाणेकर, जय धुमाळ, चिराग काळभोर यांनी परिश्रम घेतले.