स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन

0

जळगाव। शैक्षणिक अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मू.जे.महाविद्यालयाने 2 दिवसीय वार्षीक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. स्नेहसंमेलनास युवास्पंदन नाव देण्यात आलेले आहे. 8 व 9 डिसेंबर रोजी होणार्‍या या युवास्पंदन स्नेहसंमेलनात वेगवेगळ्या कार्यक्रम घेण्यात येत आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी युवास्पंदनचे उद्घाटन डॉ.शिल्पा बेंंडाळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपुजन, समई प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रार्चा डॉ.उदय कुलकर्णी, उपप्राचार्य के.जी.सपकाळे, डॉ.सुरेश तायडे, डॉ.ए.पी.सरोदे, डॉ.देवयानी बेंडाळे, डॉ.आर.टी.महाजन, प्रा.पी.बी.चौधरी, प्रा.यु.व्ही.पाटील उपस्थित होते. यावेळी संगीत विभागाच्या प्रा.प्रिया सायखेडे यांनी इशस्तवन, सरस्वती वंदन गायीले.